धुळे आगार दिवाळीत ९० जादा बस चालवणार
दिवाळीच्या काळात तीन राज्यातील प्रवाशांसाठी धुळे आगाराने तब्बल ९० बस अधिक चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीत बंपर उत्पन्न मिळविण्यासाठी धुळे विभागीय परिवहन विभागाने कंबर कसली आहे.
धुळे : दिवाळीच्या काळात तीन राज्यातील प्रवाशांसाठी धुळे आगाराने तब्बल ९० बस अधिक चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीत बंपर उत्पन्न मिळविण्यासाठी धुळे विभागीय परिवहन विभागाने कंबर कसली आहे.
धुळ्यातून मध्यप्रदेश , गुजरात आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद , नाशिक अशा महत्वाच्या शहरांसाठी विशेष दिवाळी स्पेशल बस सुरु करण्यात आल्या आहेत.
गुजरात राज्यासाठी तब्बल २९ परमिट काढण्यात आले आहेत. सुरत,अहमदाबाद आणि बडोदा या गुजरात राज्यातील शहरांमध्ये सर्वाधिक खान्देशी नागरिक राहतात.