जयेश जगड, अकोला : अकोला जिल्ह्यात एक आगळं-वेगळं लग्न पार पडलं...या लग्नाला नवरी आणि नवरदेव प्रत्यक्ष हजर नव्हते... त्यांचा फोटो आणि मूर्ती समोर ठेवून हे लग्न लावण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नपत्रिका...वाजंत्री...वऱ्हाडी मंडळींची लगबग..वधुपक्षाची धावपळ...मिरवणुकीतला जोश अगदी कोणत्याही लग्नातलं हे सर्वसामान्य चित्र....पण तरीही हे लग्न अतिशय "खास" आहे.....शंकर-पार्वती विवाह सोहळ्याची ही परंपरा राजनापूर खिनखिनी या गावानं गेल्या 300 वर्षांपासून जोपासली आहे. 


चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो...तोही अगदी खऱ्या-खुऱ्या लग्नासारखाच....सर्वच प्रथा आणि परंपरा या लग्नातही असतात...दरवर्षी गावातील दोन नवीन कुटुंबांना नवरा आणि नवरी मुलीच्या आई- वडिलांचा मान दिला जातो. 


लग्नात अनेक सामाजिक संदेशही देण्यात येतात... सोबतच पर्यावरणा विषयी जनजागृती व्हावी, यासाठी वऱ्हाडींना रोपटे भेट म्हणून दिलं जातं....हुंडा विरोधी हा लग्न सोहळा असतो...हा विवाह सोहळा पाहण्या करीता दूर-दूरहून गावकरी उपस्थित असतात.. 


चैत्रात होणारं हे लग्न या गावातील प्रत्येकाच्या घरचंच कार्य असतं....हा सोहळा गावकऱ्यांसाठी सामाजिक एकता आणि संपन्नतेचा वारसा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे...


हा विवाह सोहळा प्रतीकात्मक असला तरी यामागे लपलेल्या गावकऱ्यांच्या भावना परंपरेचं जतन करतात, हे नक्की.