धक्कादायक, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराने बालकाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या चुकीच्यी ट्रीटमेंटमुळे आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. स्वरूप नितीन चव्हाण असं मृत मुलाचं नाव आहे.
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या चुकीच्यी ट्रीटमेंटमुळे आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. स्वरूप नितीन चव्हाण असं मृत मुलाचं नाव आहे.
स्वरूप याला काही दिवसांपूर्वी बरं वाटत नव्हतं म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला सावर्डे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, तसेच तिथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी लावलेल्या सलाईनच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्वरूपच्या घरच्यांनी केला आहे.
याप्रकरणी स्वरूपच्या कुटुंबियांनी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केलीय. तसेच तब्बल 13 इंजेक्शन सलाईनद्वारे दिल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. ज्या डॉक्टरने ट्रिटमेंट केलीय त्याच्या रजिस्ट्रेशनची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉक्टर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील यांनी केली आहे.