कुत्र्याचा विरह सहन न झाल्याने पुण्यात युवकाची आत्महत्या
पुण्यात एका युवकाने आत्महत्या केली आहे . या आत्महत्ये मागचं कारण मात्र धक्कादायक आहे... घरातील पाळीव कुत्रा वारला. त्याचं दुःख सहन न झाल्याने या युवकाने आत्महत्या केली आहे. कुंवर हर्षवर्धन राघव असं या युवकाचं नाव आहे .
पुणे : पुण्यात एका युवकाने आत्महत्या केली आहे . या आत्महत्ये मागचं कारण मात्र धक्कादायक आहे... घरातील पाळीव कुत्रा वारला. त्याचं दुःख सहन न झाल्याने या युवकाने आत्महत्या केली आहे. कुंवर हर्षवर्धन राघव असं या युवकाचं नाव आहे .
प्राणी प्रेम किती टोकाचं असू शकतं याचं उदाहरण पुण्यात हर्षवर्धन राघव या युवकाच्या रूपाने पुढं आलंय. हर्षवर्धन मूळचा छत्तीसगढचा. वडील लष्करात ब्रिगेडियर. छत्तीसगढच्या घरी बॉक्सी नावाचा कुत्रा होता. बॉक्सी तेरा वर्षांपासून राघव कुटुंबाचा सदस्य होता. राघव कुटुंबातील सर्वांनाच त्याचा लळा लागला होता... पण, हर्षवर्धनचा त्यावर विशेष जीव होता. अशा बॉक्सीचा जानेवारी २०१६ मध्ये मृत्यू झाला. बॉक्सीचा मृत्यू हर्षवर्धनच्या एवढ्या जिव्हारी लागला कि, वर्षभर तो दुःखात राहिला. आणि बरोबर वर्षभराने जानेवारीतच हर्षवर्धनने आत्महत्या केली...
मृत्यू पूर्वी हर्षवर्धनने दोन सुसाईड नोट लिहून ठेवल्या आहेत... या दोन्ही सुसाईड नोट मध्ये त्याने, मी बॉक्सीकडे चाललोय. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये. असं म्हटलंय. कुत्र्याच्या मृत्यूनंतर हर्षवर्धनने वर्षभराने आत्महत्या केली असली तरी, वर्षभर तो निराशेतच होता. आणि त्यासाठी त्याच्यावर उपचार देखील सुरु होते.
हर्षवर्धन सिम्बॉयसिस कॉलेज मध्ये एमबीएच्या दुसऱ्या वर्षात होता. कुत्र्याच्या मृत्यूनं आलेल्या निराशेत त्यानं आत्महत्या केली. पण , स्वतःच्या आत्महत्येनं त्यानं आता मित्रांना आणि कुटुंबियांना निराशेत लोटलं आहे.