डोंबिवली :  डोंबिवलीतील स्फोटानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा ढिसाळपणा समोर आला आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या फार उशिराने आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्फोटानंतर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी प्रत्यक्षदर्शीशी बातचीत केली. त्यात प्रत्यक्षदर्शींनी स्फोटानंतर ढिसाळ यंत्रणेचे बिंग फोडले आहे. 


स्फोट झाल्यानंतर आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या फार उशिराने आल्या. सर्वात प्रथम अॅम्ब्ल्युन्स आली मग अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. 


स्फोटाचा आवाज कोपर गावापर्यंत 


स्फोट झाला तेथून कोपर गाव हे साधारणतः ४ ते ५ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु इस्टला झालेला हा स्फोट वेस्टला कोपर गावपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला.