डोंबिवली : इंटिरियर डेकोरेशनच्या वादातून किशोर चौधरी या व्यक्तीची चौदा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. कल्याण क्राईम ब्रांचने ही कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परेश आंधळे आणि कुणाल आंधळे या दोघांना नाशिक इथून ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी दिलीप भोईरसह अद्याप 8 जण फरार आहेत. चोळे गावातील बालाजी नगर परिसरात देवी शिवामृत नावाची इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर फ्लॅटचं काम करायचे होते. 


इंटेरियर डेकोरेशनचं हे काम किशोर चौधरी आणि नितीन जोशी यांनी घेतलं होतं. मात्र या परिसरात राहणारे दिलीप भोईर या कामासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना हे काम न मिळाल्यानं त्यांनी हा गोळीबार करण्यात आला. यांत किशोर चौधरींचा मृत्यू झाला तर नितीन जोशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.