COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोणावळा : पुण्यातील कॉलेजच्या तरूण-तरूणींच्या ग्रुपसाठी भूशी डॅम हा आवडता स्पॉट आहे, पण पावसाळ्यात शनिवारी-रविवारी भूशीडॅमला जाणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही.


भूशी डॅमचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनासमोर आता आव्हान उभं ठाकलं आहे की, ही गर्दी आता नियंत्रणात आणायची कशी?


 भूशी डॅममध्ये आतापर्यंत अनेक वेळा तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण आता गर्दीत चेंगरून जीव जातील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.


 हे सर्व यू-ट्यूबवर हा व्हिडीओ पाहून लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.