केवळ एका मताने मिळाले नगराध्यक्षपद
राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायत निवडणुकींचा काल निकाल लागला.
वाई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायत निवडणुकींचा काल निकाल लागला.
या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले. सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असून दुसऱ्या स्थानी काँग्रेस आहे. नगरसेवकांच्या संख्येत तिसऱ्या स्थानी शिवसेना आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीला चांगलाच धक्का दिला. वाई येथील नगरपालिका निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आरपीआय आघाडीच्या डॉ. प्रतिभा सुधीर शिंदे यांना केवळ एका मताने नगराध्यक्षपद मिळाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.
कोकण विभागातील रोह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पोटफोडे अवघ्या 6 मतांनी विजयी झाले. त्यांनी अपक्ष समीर शेडगे यांना पराभूत केले.