लातूर : दुष्काळ अनेकांच्या संसाराच्या मुळावर उठलाय. आधीच गरीबी त्यात शेतात काम असलं तर पोट भरत मात्र जिथं शेतात काम नाही तर संसार चालवायला पैसै येणार तरी कुठून हा प्रश्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगापूरचे नागनाथ शिंदे सध्या फक्त एकच विचारात असतात ते म्हणजे संध्याकाळी कूटुबियांचे पोट कसे भरावे याचा. घरी शेती होती मात्र ती कुटूबियांच्या वादात गेली त्यानंतर पोट भरण्यासाठी एकच साधन उरलं ते म्हणजे, शेतात मजूरी करणं, शेतात काम होत तोपर्यंत ठिक होत, घर चालायचं, किमान अन्न पाण्याची भ्रांत नव्हती मात्र आता चित्र फारच गंभीर झालय.


गेली तीन वर्ष दुष्काळानं कुणाच्याच शेतात काम नाही, त्यामुळ मजुरी करावी कुठं हा प्रश्न त्यात दुसर काही मजुरीच काम मिळालं तर ठिक नाहीतर कठीणच. सध्या घरातील स्त्रीला महिन्यातून 8 दिवस काम मिळत त्यात कसबेसे 1500 रुपये मिळतात. तर घरातील कर्ता पुरूष सरकारी कार्यालयाच्या बाहेर जावून लोकांना अर्ज भरून देतात त्यात पैसै मिळाले तर ठिक नाहीतर जगणं कठीणच.


घरी 2 मुली आणि दोन मुलं मात्र आता त्यांचे शिक्षण सुटले आहे. खायलाच पैसै जमवणं कठीण त्यात शिक्षण काय करायचे, साधं पाणीही आता विकत घ्यावं लागतंय, त्यामुळं काय करावे कळत नाही. मुलं शिकायचं म्हणतात मात्र त्यालाही सोय नाही. 


दुष्काळानं कुटूंबियांची दैना केली आहे, यांना मदतीचा आधाराची गरज आहे, तरच हे कुटूंब जगू शकणार आहे. किमान या वर्षी तरी पाऊस पडावा आणि हाताला काम लागावे हीच अपेक्षा या कुटूबियांना आहे.