जालना : आपल्या देशात पाणी कमी आहे म्हणून दुष्काळ नाही तर उपलब्ध पाण्याचं नियोजन नाही म्हणून दुष्काळ असल्याचं मत ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांनी व्यक्त केलं. जालना इथं आजपासून दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे.


साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दत्ता भगत हे बोलत होते. उपलब्ध पाण्याचं नियोजन करण्याची सक्ती देखील केली जात नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना.धो.महानोर यांनी दुष्काळ हटू शकतो मात्र त्यासाठी कडवी इच्छाशक्ती असण्याची गरज आपल्या भाषणातून व्यक्त केली. त्यामुळे मराठवाडा साहित्य संमेलनामध्येही दुष्काळाबाबतचे सूर उमटले.