लातूर : एकेकाळी शिक्षणाच्या विशेष पॅटर्नसाठी प्रसिद्ध असणारं लातूर हळूहळू खासगी शिकवण्याच्या विळख्यात पुरतं अडकून गेलंय. आणि याच शिकवण्यांचे पैसे भरताना पालक हैराण झालेत. लातूरमध्ये अशाच एका शिक्षिकेनं फिचे पाचशे रुपये थकवल्याने मुलाच्या पालकांचा जीव कसा टांगणीला लावला. हा स्पेशल रिपोर्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिकवणीचे पाचशे रुपये थकवले म्हणून आपल्या अनोख्या पॅटर्नसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूरमध्ये एका महिला शिक्षेकनं तिच्या विद्यार्थ्याला कोंडल्याचा प्रकार पुढे आलाय. तिसरीत शिकणारा उबेद काल घरासमोर खेळतोय असं बघून त्याची ट्युशन शिक्षिका वृशाली कामदारने त्याला उचलून आपल्या घरी नेलं. जोपर्यंत फिचे 500 रुपये मिळणार नाहीत, तोवर मुलाला सोडणार नाही, अशी धमकीच पालकांना दिली.


पालकांनी मुलाला सोडण्याची विनंती केली. पण उपयोग झाला नाही. शेवटी झी मीडियाचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. नऊ वर्षाचा उबेद वृषाली कामदारांच्या घरात रडत असल्याचं स्पष्ट दिसले. पण शिक्षिकेला काही केल्या पाझर फुटला नाही. कॅमेरासमोरही शिक्षिकेची अरेरावी कमी झालेली नाही


सत्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन झी मीडियाच्या प्रतिनिधींनी साऱ्या प्रकाराची कल्पना पोलीसांना दिली होतीच. सांयकाळी पाच ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत उबेद वृषाली कामदार यांच्या नजरकैदेत होता. अखेर त्याची सुटका झाली. रात्री साडे नऊच्या सुमारास पोलीस वृषाली कामदारच्या घरी पोहचले त्यांच्याशीही महिला शिक्षिकेनं हु्ज्जत घातली. दरम्यान जे घडलं, तो गंभीर गुन्हा आहे. पालकांनी तक्रार केल्यावर कायदेशीर कारवाई करु असं पोलिसांनी म्हटले आहे.