अहमदनगर : रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्याने अकरावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील नुतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे. प्रणित गुंजाळ असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नावं आहे. 


दर सोमवारी किशोरवयीन मुला मुलींना आयर्न अँण्ड फोलिक अँसिड गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या रक्त वाढीच्या ( आयर्न अँण्ड फोलिक अँसिड ) आहेत. मात्र, त्याने  गोळ्या जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कॉलेज प्रशासनाने दिली.