बारामती : बारामतीमध्ये तब्बल 6 कोटी 89 लाख रुपये पकडण्यात आले आहेत. बारामतीतल्या भिगवण टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पकडण्यात आलेली ही रक्कम बारामती सहकारी बँकेची आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकानं ही कॅश पकडली आहे. निवडणूक यंत्रणा अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.