दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट
नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट होऊ लागलंय. पुण्यातल्या 10 पैकी नऊ ठिकणाच्या आघाडीचे आकडे समोर येत आहेत.
मुंबई : नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट होऊ लागलंय. पुण्यातल्या 10 पैकी नऊ ठिकणाच्या आघाडीचे आकडे समोर येत आहेत.
बारामतीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी तर इंदापूर, जेजुरी आणि सासवडमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष होणार आहेत. तर भाजपनं तळेगाव, लोणवळा, आळंदीत विजयी आघाडी घेतलीय. तर शिवसेनेला जुन्नरमध्ये आघाडी मिळालीय. तर शिरूरमध्ये स्थानिक आघाडीनं भाजपच्या बाबूराव पाचर्णेंना पाणी पाजलंय.
लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप आणि एमआयएम प्रत्येकी एक नगराध्यक्षपद मिळवलंय. तर अहमदपूरमध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं चित्र आहे.