रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त वक्तव्य, निवडणुकीत `लक्ष्मी` महत्वाची!
मतदानाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ महत्वाची असते. आदल्या दिवशी घरात लक्ष्मी येते. तिचा स्वीकार करा, असे वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे केले.
औरंगाबाद : मतदानाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ महत्वाची असते. आदल्या दिवशी घरात लक्ष्मी येते. तिचा स्वीकार करा, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे जाहीर सभेत केले. त्यामुळे यावरुन राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीने दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मतदानाच्या एक दिवस आधी संध्याकाळ महत्त्वाची असल्याचे सांगत त्यावेळी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा, असे वादग्रस्त विधान दानवे यांनी पैठण प्रचार सभेत केलं. उद्या नगरपरिषदांचा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
निवडणुकीत पैशाचा वापर होत असल्याचे दानवे यांच्या वक्तव्यामुळे अधोरेखित झाले आहे. निवडणुतीत घोडेबाजार होतो, अशी नेहमी टीका व्हायची, आता भाजपच्या जबाबदार व्यक्तीने असे वक्तव्य केल्याने भाजप अडचणीत सापडला आहे. दरम्यान, दानवे यांनी आपल्या व्यक्तव्यावर घुमजाव केले आहे. त्यांनी लगेच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी लक्ष्मीचे स्वागत करा असे म्हटले. स्वीकारा असे म्हटलेले नाही, असे स्पष्टीकर लगेच दानवे यांनी केले.