डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा अकरावर
डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकरांच्या कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकरांच्या कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात त्यांच्या दोन मुलांचा आणि सुनेचा समावेश आहे. सुमीत आणि स्नेहलता वाकटकर या दोघा पती पत्नीचा बळी गेलाय. तर दुसरा मुलगा नंदन वाकटकर यांचाही मृतदेह सापडला आहे.
विशेष म्हणजे स्नेहलता वाकटकर यांचा मृतदेह घटनास्थळापासून लांब २०० ते ३०० मीटर अंतरावर एका इमारतीच्या छतावर सापडला. सुमीत आणि स्नेहलता यांचा नुकताच विवाह झाला होता. हे दोघेही केमिकल इंजीनिअर होते. या स्फोटामधल्या मृतांचा आकडा आता अकरावर पोहोचला आहे.