ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. गेल्या काही महिन्यांपासून अण्णांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येतायत.
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. गेल्या काही महिन्यांपासून अण्णांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येतायत.
याच पार्श्वभूमीवर नगरचे पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सरकार दरबारी मागणी करुन अण्णांच्या सुरक्षेत वाढ केलीय. याआधी अण्णांना झेड दर्जाची सुरक्षा होती. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि ८ कर्मचा-यांची वाढ करण्यात आलीय.
आता अण्णांच्या सुरक्षेसाठी २ पोलीस अधिकारी आणि ३२ पोलीस कर्मचारी तैनात असतील. या सुरक्षेबाबत अण्णांनी नाराजी व्यक्त केली असून ही वाढ करण्यात येऊ नये अशी मागणी सरकारकडे केलीय.