ठाणे : बोगस कॉल सेंटर प्रकारणातील मुख्य आरोपी  सागर तथा शेगी ठक्कर याला ठाणे गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. जवळपास ५०० कोटी कोटी रुपयांचा गंडा विदेशी नागरिकांना घातला होता. सागरला १३ एप्रिलपर्यंत  पोलीस कोठडी देण्यात आली आहे.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ९ वर्षांपासून सागर हा बोगस कॉल सेंटर चालवत होता. त्याने १०० मिलियन डॉलरपर्यंत हा घोटाळा केला होता. म्हणजेच ५०० कोटी रुपयांचा हा घोटाळा पुढे आलाय. सागर ठक्करने बीएससी केमिस्ट्री शिक्षण घेत  आहे. त्यांने अमेरिकेतील अनेक नागरिकांना फसविले.


५०० कोटींचा घोटाळा करुन दुबईला पळून जाणाऱ्या सागरचे संयुक्त अरब अमिरातीने प्रत्यार्पण केले. त्यानुसार त्याला मुंबईला आणण्यात आले. मीरा रोड येथे खोटे कॉल सेंटर चालवून सागरची बनावट कंपनी अमेरिकन लोकांची आर्थिक फसवणूक करत होती. या गोष्टीचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी कॉल सेंटरवर छापे टाकले. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते.


तो इंटर्नल रेव्हेन्यू सर्विसमधून फोन करत अधिकारी असल्याचे भासवत होता. टॅक्स डीफोल्डर आहेत असे सांगून फसवणूक करत. अमेरिकेतील नागरिकांकडून तडजोडी करून गिफ्ट कार्डच्या माध्यमातून किंवा रोख डॉलरच्या स्वरूपात us डॉलरच्या रकमा स्वीकारून मोट्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे ठाणे पोलिसांना दिसून आले.


मिरारोड बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आतापर्यंत ३९७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे पोलिसांनी ७० आरोपीना ताब्यात घेतले होते. १३ आरोपी फरार होते. मुख्य आरोपी सागर ठक्कर याला पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतले. 


भारताबाहेर मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यामुळे अमेरिकन रेड कॉर्नर नोटीस दिली होती. दरम्यान, भारतात देखील रेड कॉर्नर नोटीस पाठवणार होते. त्याअगोदर भारतात येण्यापूर्वी ठाणे पोलिंसानी सागरला अटक केली. दुबईवरून मुबईकडे येताना मुंबई विमानतळावर त्याला अटक केली, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी दिली.