नाशिक : बँकेच्या खात्यातून पैसे पळवणाऱ्या सायबर हॅकर्सने आता आदिवासी जनतेकडे लक्ष वळवलंय. विशेष म्हणेज केवळ मौजमजा करण्यासाठी काही गुन्हेगार हे कृत्य करत आहेत. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अशा गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचं नाशिकच्या एका घटनेत उघड झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या पेठ या आदीवासी तालुक्यात राहणारे जनार्दन गवळी. आणि त्यांचा भाचा धनराज गायकवाड. धनराजला तीस जूनला एक कॉल आला. त्यात बँकेतून बोलतोय असं सांगण्यात आले. तुझं कार्ड बंद होणार असून नुतनीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी त्याचे बँक डिटेल्स आणि डेबिट कार्डाचे डिटेल्स विचारण्यात आले. 


धनराजने ही सर्व माहिती सांगितली आणि त्याच्या बँक खात्यातून ८६ हजार रूपये लंपास करण्यात आले. विशेष म्हणजे बँकेत तपास केला असता मुंबईतील एका एअर तिकीट एजन्सीतून विमानाची तिकीटं काढण्यात आली आहे. पेठ पोलीस या घटनेकडे किरकोळ समजून केवळ कागदावर तक्रार नोंदवत आहेत. अधीक्षक कार्यालयात पेठ पोलीस तक्रार पाठवत नाहीत तोवर काही करू शकत नाही असं सांगण्यात येते.


धनराजचे वडील सध्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलध्ये हृदयविकारावर उपचार घेत आहेत. असं असताना याचा तपास करण्यासाठी तुम्हाला मुंबईला जावं लागेल असं सांगण्यात आल्याने गायकवाड कुटुंबिय अडचणीत आलेत. पोलीस याबाबत काहीही बोलण्यास तयार नसून सरकारन पोलिसांच्या या बेफिकीरीवर अंकुश ठेवण्याची गरज आहे.