अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवनाथ जाधव यांच्या विहिरीत बसून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतसंस्थेचे कर्ज माफ़ करावं आणि जप्तीची कारवाई थांबवावी, या मागणीसाठी विहिरीत बसून आंदोलन करत आहे. आता त्यांच्या आंदोलनात परभणीतल्या बारावीच्या विद्यार्थ्यानंही उडी घेतलीय. दत्ता नारायण रेंगे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यात बारावीचं शिक्षण घेत आहे.


दत्ता रेंगेनं अकोले तालुक्यातल्या मन्याळे गावातल्या भैरवनाथ जाधव यांच्या आंदोलनाची बातमी कळल्यानंतर त्यानं जाधव यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानं काल रात्री थेट मन्याळे गांव गाठलं आणि विहिरीत उतरून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. जाधव यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं दत्तानं सांगितलंय. 


जाधव यांच्या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेनेसुद्धा पाठिंबा दर्शवलाय. मंगळवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अकोल्याचे आमदार वैभव पिचड़, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी तहसीलदारां सह आंदोलनस्थळी भेट देवून जाधवांना आंदोलन मांगे घेण्याची विनंती केली.