शिर्डी : एक जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत... त्यासंदर्भातील रणनिती पुणतांब्यामधील किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 मे पासून पुणतांब्यात धरणं आंदोलन सुरू करण्यात येणार असून 1 जून पासून दूध, भाजीपाला विक्री बंद करण्यात येणारेय. ठिकठिकाणचे आठवडी बाजारही बंद करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय. परराज्यातील दूध, भाजीपालाही शेतकरी रोखणारेत. 


या व्यतिरिक्त गनिमी कावा आंदोलन करणार असल्याचंही या बैठकीत ठरवण्यात आलंय. आजच्या बैठकीला शेतकरी नेते रघूनाथदादा पाटील उपस्थित होते. शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी बाजार समिती, हमाल, मापाडी संघाची मदत घेण्यात येणारेय. संप काळात कुठलाही रास्ता रोको, तोडफोड, हिंसक आंदोलनं न करण्याचं आव्हान शेतक-यांना करण्यात आलंय.