परभणी : परभणीत आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय. थकलेल्या कर्जाला कंटाळून कैलास आकात या ३५ वर्षीय अल्प भू-धारकानं आपलं जीवन संपवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास आकात हा सेलू तालुक्यातील रायपूरचा कैलास रहिवासी होता. कैलास यांच्याकडे सेलूच्या देना बँकेचं १,४०,००० रुपयांचं कर्ज थकलं होतं. शेतात काम करून हे कर्ज फिटण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा शेती बटईने लावून कैलास पुण्याला काम शोधण्यासाठी गेला होता. 


पुण्यातही कैलासच्या हाती काही यश लागलं नाही. त्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली. त्यामुळे, विषारी औषध प्राशन करून कैलासनं आपली जीवनयात्रा संपवली. सेलू शहरातील जिंतूर कॉर्नर परिसरात ही घटना घडली. 


सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. परंतु, या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेण्याचं काही नाव घेत नाहीत, हे पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आलंय.