नाशिक : मीना भीमसिंग तुपे  'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी'पदाचा मान पटकावला आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढेच नव्हे तर मीना भीमसिंग तुपे या पोलीस अकादमीच्या इतिहासात 'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी'पदाचा मान मिळविणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.


बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपूर-खामखेडा येथील शेतकरी भीमसिंग आणि शशिकला तुपे यांच्याकडे केवळ चार एकर कोरडवाहू शेती आहे. तुपे यांना चार मुली अन् एक मुलगा. मीना सर्वात मोठ्या. त्यांनी लहानपणापासून वडिलांना शेतीच्या कामात मदत केली. 


प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीचा नाशिकमध्ये बुधवारी  दीक्षान्त समारंभ झाला, त्यात मीना यांना 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' पुरस्काराने गौरवण्यात आले.