छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांची आत्महत्या
नात्यातलाच मुलगा छेडछाड करायचा. त्यातून वादही निर्माण झाले वाद मिटला पण त्यानंतही हा प्रकार सुरूच राहिला अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांचं निधन झालं.
अहमदनगर : नात्यातलाच मुलगा छेडछाड करायचा. त्यातून वादही निर्माण झाले वाद मिटला पण त्यानंतही हा प्रकार सुरूच राहिला अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांचं निधन झालं.
ही घटना आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात बाभळगाव खालसामधली. नात्यातलाच मुलगा छेड काढायचा आणि कोपर्डीसारखी अवस्था करेण अशी धमकीही द्यायचा.
याप्रकरणी मृत व्यक्तीनं कर्जत पोलिसांत तक्रार दाखल केली. ग्रामस्थांच्या मध्यस्तीनं हे प्रकरण मिटवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा वाद झाला अखेर मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी विष पिऊन आत्महत्या केली.
पीडित मुलीनं चार तारखेला कर्जत पोलिसांत फिर्याद दिलीय. अनेकवेळा घरात घुसून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप यात मुलीनं केलाय. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.