तासगावात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा
सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या पाच नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांना गालबोट लागलं आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या पाच नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांना गालबोट लागलं आहे. तासगावमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. प्रभाग सहामध्ये हे दोन्ही गट आमने सामने आले आणि हा राडा झाला. या राड्यानंतर वातावरण तंग झाल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
सांगली जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि तीन नगरपंचायती साठी दुपारी तीन वाजे पर्यंत 72 टक्के मतदान झालं. एकूण 161 जागांसाठी 514 उमेदवार तर पाच नगराध्यक्षपदासाठीच्या 28 उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. या निवडणुकांची उद्या मतमोजणी होणार आहे.
इस्लामपूर, आष्ठा, तासगाव, विटा आणि पलूस ह्या नगरपालिका आणि कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायतीसाठी हे मतदान झालं. लोकांनी सकाळ पासूनच उस्फूर्तपणे मतदान केलं. अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.