नाशिक : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्टयांमध्ये तूफान हाणामारी झाली आहे. रेडिओचे स्टेशन बदलण्यावरून कैद्यांमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. कैद्यांमधला वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांनाही मारहाण झाली आहे. या प्रकरणी आरोपी शाकिर पठाण आणि समीर पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.