मिरजमध्ये पोलिसांदेखत दोन गटांत तुंबळ हाणामारी
सांगलीतल्य़ा मिरजेत माळाभागात दोन गटांत तुंबळ हाणामारी झालीय. यात माजी नगरसेवक पिता-पुत्रावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आलाय. त्यात इब्राहीम चौधरी गंभीर जखमी झालेत.या प्रकारणी चार जणांना अटक करण्यात आलीय.
मिरज : सांगलीतल्य़ा मिरजेत माळाभागात दोन गटांत तुंबळ हाणामारी झालीय. यात माजी नगरसेवक पिता-पुत्रावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आलाय. त्यात इब्राहीम चौधरी गंभीर जखमी झालेत.या प्रकारणी चार जणांना अटक करण्यात आलीय.
हल्लेखोर समीर शेख, नौशाद शेख, खाँज्या शेख आणि जमीर शेख अशी त्यांची नावं आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इब्राहीम यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्यांनं त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. पोलिसांपुढेच ही हाणामारी झाली.
माजी नगरसेवक आरिफ चौधरीही या हाणामारीत जखमी झालेत. त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं बोललं जातंय.