औरंगाबाद फटाका आगीचं गूढ उकललं
ऐन दिवाळीत लागलेल्या औरंगाबादची फटाका मार्केटच्या आगी प्रकरणी मोठा खुलासा झालाय.
औरंगबाद : ऐन दिवाळीत लागलेल्या औरंगाबादची फटाका मार्केटच्या आगी प्रकरणी मोठा खुलासा झालाय. एका सिगरेटनं संपूर्ण फटाका मार्केट आगीत भस्मसात झाल्याचं आता पुढं आलंय.
जवळपास 15 कोटींहून अधिक रुपयांचे फटाके आणि दीडशेवर दुचाकी या आगीत जळून खाक झाल्या होत्या. ही आग कशामुळे लागली याची गेली दोन महिने चौकशी सुरु होती
या विशिष्ट दुकानाच्या मागे काही लोक रोजच सिगारेट ओढत होती. या दुकानाचा मालक अगदी दुकानाला चिटकून उभा होता आणि सिगारेट ओढत होता. त्यादिवशी सिगारेटची आग फटाक्यात घुसली आणि पाहता पाहता संपूर्ण बाजारपेठ जळून खाक झाली. या प्रसंगी आता गुन्हे दाखल झाले आहेत आणि अटकसत्रही सुरु होणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.
या प्रकरणात दुकान मालकासह संघटनेच्या पदाधिका-यांना अटक करण्यात आलेत. निष्काळजीपणा, जीव धोक्यात घालणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेत. या प्रकरणी आधीच 4 लोकांना अटक झालेली आहे, तर आता अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.