ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात दादरकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या मागच्या डब्याला अचानक आग लागली... आणि प्रवाशांत एकच गोंधळ उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे रेल्वे स्टेशनवरच्या फलाट क्रमांक - ५ वरच्या पेंटाग्रामच्या शॉकसर्किटमुळे ही आग लागली होती. पेटाग्राफच्या आगीची झळ लोकलच्या मागच्या बोगीलाही लागली... आणि या बोगीनं पेट घेतला. 


आग विझवण्यात यश आल्यानंतर लोकल कारशेडला रवाना करण्यात आलीय. १० ते १५ मिनिटं लोकल फलाटावर असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर थोडाफार परिणाम दिसून आला.