पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे. हिंदू जनजागरणच्या वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आली आहे. तावडेला सीबीआयकडून अटक करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने पुणे आणि पनवेल येथे छापे मारले होते. पुण्यात सारंग अकोलकर आणि पनवेलमध्ये डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या घरी सीबीआयने छापे मारले होते. हे दोघेही सनातनचे साधक असल्याचे सांगितले जात आहे.


डॉ. दाभोलकर यांची हत्या सनातन संस्था आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागरण समितीनेच केली आहे, असे ट्विट आम आदमी पक्षाचे आशिष खेतान केले होते.