वणी : ज्ञानेश्वरी पारायणात काल्याचा प्रसाद खाल्यानंतर शंभराहून अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील बाजीराव महाराज मठात आयोजित महाप्रसादाच्या जेवनानंतर ही विषबाधा झाल्याने भक्तांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णांना वणीच्या च्या ग्रामीण रुग्णालयासह शहरातील इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरवर्षी सुकनेगावच्या बाजीराव मठात बाजीराव महाराज यांचा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहात महाराष्ट्र सह आंध्र प्रदेश परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.


 या वर्षी सुद्धा हजारो भाविक सप्ताहात सहभागी झाले होते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद घेतल्या नंतर भाविकांना  उलटी  आणि मळमळ होऊ लागली, तेव्हा उपस्थितांनी तात्काळ या लोकांना वणी येथील खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
 
 कार्यक्रमास्थळी ठेवण्यात आलेले पाण्याचे ड्रम हे शेतातील होते व त्यात पूर्वी पेस्टीसाईड असण्याची शक्यता आहे. ते नीट स्वच्छ न करता वापरल्याने त्यातील पाण्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली. 
 
 विषबाधितामध्ये महिला व बालकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 100 च्या वर नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.