माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार
काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार आहेत. सकाळी 11 वाजता ते चिपळूण पोलीस ठाण्यात हजर होतील.
चिपळूण : काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार आहेत. सकाळी 11 वाजता ते चिपळूण पोलीस ठाण्यात हजर होतील.
काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी निलेश राणेंवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आज राणेंसोबत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर राहणार असल्याचं समजतंय.