लातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन
लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.
लातूर : लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.
१९ लाखांच्या जुन्या नोटा बदलून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बँक अधिकारी विकास कदम आणि अन्य तीन जणांना निलंबित करण्यात आलंय. बँक प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच पैसे भरणे आणि काढणे यासाठीची मर्यादा ठरवण्यात आलीये. अडीच लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यात भरल्यास आयकर खात्याकडून चौकशी होऊ शकते.