पुणे : स्वाईन फ्लूमुळे पुण्यात दोन दिवसांत चार जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे स्वाईन फ्लुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २४ वर पोहोचलीय. तर स्वाईन फ्लू झालेल्या रूग्णांची संख्या १३५ वर पोहोचलीय. यात आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वातावरणातल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा फैलाव होतोय. स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी लसीकरणाची सोय शासकीय रूग्णालयात करण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रमुख सोमनाथ परदेशी यांनी दिलीय.