पुणे: तब्बल 31 तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या वर्षांच्या सुनील मोरेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सुनील मोरेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुण्यातील ससुन रुग्णलयात दाखल करण्यात येत होते. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचं निधन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीआरएफच्या टीमनं अथक प्रयत्नांनी त्याला बाहेर काढलं, पण चिमुकल्या सुनिलची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. मांडवगण फराटा येथील जुना मळा इथं शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुनिल मोरे हा चारवर्षांचा चिमुरडा खेळता खेळता बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता. 


जवळपास 25 फूट खोल खड्ड्यात तो अडकला होता. सुनिल बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याचं कळताच त्याच्या बचासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले त्याला वाचवण्यासाठी फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी आणि गावक-यांनी बचाव मोहीम सुरु केली.


तब्बल 31 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सुनीलला बाहेर काढण्यात आलं. बोअरवेलमध्ये पडला असल्याने त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या.