`तुझ्यासाठी कायपण मित्रा`
तुझ्यासाठी कायपण मित्रा म्हणत अकोल्यातल्या आदर्श विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मित्रासाठी मदतफेरी काढलीय. त्यांच्यातली मैत्री आणि माणुसकी पाहून सारे अकोलावासियही भारावून गेलेयत. काय झालंय नेमकं त्यांच्या मित्राला आणि कशी करू शकता तुम्हीही त्याला मदत पाहुयात त्यासाठी ही यशची कहाणी.
अकोला : तुझ्यासाठी कायपण मित्रा म्हणत अकोल्यातल्या आदर्श विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मित्रासाठी मदतफेरी काढलीय. त्यांच्यातली मैत्री आणि माणुसकी पाहून सारे अकोलावासियही भारावून गेलेयत. काय झालंय नेमकं त्यांच्या मित्राला आणि कशी करू शकता तुम्हीही त्याला मदत पाहुयात त्यासाठी ही यशची कहाणी.
यश उमाळे. अकोल्यातल्या महात्माफुले नगरमध्ये राहतो. गेल्या दीड वर्षापासून मेंदुच्या आजारामुळे जीवनाशी संघर्ष करतोय. पण घरातलं अठरा विश्व दारिद्र्य आता उपचारांच्या आडे येतंय.
वडील गवंडी. आई गृहिणी. पण नोटाबंदीमुळे वडलांचंही काम गेलं. त्यामुळे तेही घरातचं असतात. हातात पैसे नसल्यानं अखेर यशचे उपचार थांबण्यात आले. ही बाब यशच्या वर्गमित्रांना कळली आणि मैत्रीचा बांध फुटला.
मित्रासाठी काय पण म्हणत त्याच्या उपचारांसाठी संपूर्ण वर्ग पुढे आला. हेल्प बॉक्स तयार करण्यात आला आणि ही दहावीत शिकणारी सगळी मुलं मित्राच्या मदतीसाठी नागरिकांना साद घालू लागली. हे पाहून सारेच हेलावून गेले. आता शाळेतल्या शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनीही यशच्या उपचारांसाठी मदतीचे हात पुढे केलेयत.
यशच्या उपचारांसाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी
शिवहरी श्रावण उमाळे,
बँक : स्टेट बँक आँफ इंडिया,
विद्यापीठ शाखा, नागार्जून उद्यानाच्या बाजूला, अकोला.
Account No. : 32630786340
IFSC Code : SBIN0002171
या खात्यात रक्कम जमा करू शकता.
मोठ्यांनी लहानांना आयुष्याचे धडे द्यायचे असतात. पण इथे तर लहानांनीच मोठ्यांना माणुसकीचा असा काही पाठ दिलाय की पालकही त्यांना सलाम करतील. आणि निश्चितच मुलांचा हा पुढाकार पाहून यशच्या उपचारांसाठी निधी जमा होऊन यशच्या उपचारांना यश येईल.