धुळे  : जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहचलंय. त्यामुळे बाजारात रसदार फळांची मागणी वाढलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्राक्ष, आंबा, खरबूज, टरबूज आदी फळांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे यंदाच्या मोसम फळविक्रेत्यांसाठी जोरदार राहणार आहे. मार्च महिन्यातच अशाप्रकारे फळांचा खप वाढल्याने फळ विक्रेते यंदा खुश आहेत. 


खानदेशात सूर्यनारायण चांगलाच तापला आहे. गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात उच्च तापमानाची नोंद होतेय. सूर्यनारायण आग ओकू लागल्याने सकाळी १० पासूनच उन्हाचे चटके बसू लागलेत.