नांदेड : पुण्यातला कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याच्या भाजपा प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजब प्रतिक्रिया दिलीय. सर्वच पक्षांमध्ये अशा व्यक्ती प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भाजप गुंडांना प्रवेश देत नाही पण एखाद्याने पद दिल्यानंतर गुन्हा केला असेल तर त्याचा वेगळा विचार पक्ष करेल असे लंगडे समर्थनच दानवे यांनी केले आहे. म्हणजे पक्षात प्रवेश देण्यापूर्वी संबंधितांची पार्श्वभूमी पाहिली जात नाही का, असा प्रश्न दानवेंच्या वक्तव्यामुळं उपस्थित झाला आहे. 


दानवे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळत असे अनेक प्रसंग सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे नांदेडमध्ये बोलत होते. पक्षाच पद देत असतांना तो जर गुन्हेगार असला तर त्याचा विचार वेगळा होतो आणि जर पक्षाच पद दिल्यानंतर त्याने गुन्हा केला असेल तर त्याचा विचार वेगळा होतो असे सांगून दानवे यांनी गुंड विठ्ठल शेलार याच्या पक्ष प्रवेशाबाबत आपले वेगळे निकष सांगितले.


भाजप गुंडांना थारा देत नाही कुणावर गुन्हा सिद्ध झाला असेल तर पक्ष संघटना त्यावर कारवाई करेल, अशी प्रतिक्रीया दानवे यांनी दिली.  


 विठठ्ल शेलार कोण आहे?


दरम्यान, पुण्यातील मुळशीतील कुख्यात गुंड विठठ्ल शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. विठठ्ल शेलार हा उरवडे गावाजवळील बोकरवाडीचा आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.