नवी मुंबईत दिवाळी सणात कचऱ्याचे साम्राज्य, प्रशासन जबाबदार - महापौर
नवी मुंबईमधल्या सफाई कर्मचा-यांचा बेमुदत संप प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळेच चिघळल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. गेले चार दिवस कचराच उचला नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीबरोबर डासांचे प्रणाण वाढले आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमधल्या सफाई कर्मचा-यांचा बेमुदत संप प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळेच चिघळल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. गेले चार दिवस कचराच उचला नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीबरोबर डासांचे प्रणाण वाढले आहे.
पालिका ठेकेदारांना किमान वेतन देण्यासाठी आग्रही असूनही, प्रशासन ते मान्य करत नसल्याचा आरोप महापौर सोनवणेंनी केला. तर अधिकारी, कर्मचा-यांना दिवाळीचं सानुग्रह अनुदान देण्याचं पालिका स्थायी समितीमध्ये मंजूर झाले. तरीही प्रशासन कारवाई करत नसल्याची टीका महापौरांनी केली.
24 ऑक्टोबरपासून सफाई कर्मचा-यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे, शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. कचऱ्याच्या गाड्या रस्त्यावर ओतून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कचऱ्याने अर्धा रस्ता व्यापला आहे.