पुणे : लोक म्हणतात घनश्याम लय भारी... पण, मी म्हणतो... राष्ट्रवादी काँग्रेस लय भारी... असं म्हणत दणक्यात चिमुरड्या घनश्याम दराडेनं आपल्या पुण्यातल्या भाषणाला सुरुवात केली... आणि आपोआपच अनेक श्रोत्यांचं लक्ष आपसुकच राष्ट्रवादीकडे वळलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषण शैलीमुळे अचानक प्रकाश झोतात आलेला चिमुरडा घनश्याम सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसतोय. सध्या घड्याळाची कशी गरज आहे, हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न हा चिमुकला नेता करतोय. 


या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेदेखील उपस्थित होते... यावेळी घनश्यामनं राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजितदादांची तोंड भरून स्तुतीही केली. 


मुख्य म्हणजे, यामुळे मतदारांचं लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी राष्ट्रवादीला यश मिळालं, असं म्हणावं लागेल.