नवी मुंबई : खारघर येथील पाळणाघरात चिमुकलीला अमानुष मारहाण केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पाळणाघरं आणि नर्सरींबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नवी मुंबईतील पाळणाघरं आणि नर्सरींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 127 पाळणा घरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 खारघरच्या पूर्वा डे केयर आणि नर्सरी या पाळणाघरात चिमुकलीला अमानूष मारहाण करण्यात आली. या प्रकरणामुळे पालना घरात पालक ज्या विश्वासने आपल्या मुलाना पालना घरात सोडून जातात त्या विश्वासलाच आता तड़ा गेला आहे.


या पाळणाघरात सीसीटीव्ही नसते तर हा अमानुष अत्याचार उघड झालाच नसता. त्यामुळे आता पोलीस प्रशासनही खड़बडून जागं झाले आहे. पोलिसांनी प्रत्येक पाळणाघरं आणि नर्सरींना नोटीस बजावून सीसीटीव्ही लावण्याची, सीसी टीव्हीची लिंग पालकांना देण्याची आणि  कर्मचा-यांची माहिती पोलीस स्टेशनला देण्याची सक्ती केली आहे.


पोलिसांनीच घेतलेल्या या पुढाकारामुळे नवी मुंबईतील पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र ही सक्ती केवळ नवी मुंबईपूरती मर्यादीत न रहाता त्याला कायद्याचा आधार देत संपूर्ण राज्यभर याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.