वसई :  अनैतिक संबंधातून  जन्मलेल्या   मुलीला  आश्रमाच्या  बाहेर ठेवणाऱ्या दोघा मुला मुलीना वसईच्या माणिकपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दोघेही विरार इथे राहत  असून याचे  प्रेम संबंध होते.  विवाह बाह्य  प्रेम संबंधातून त्यांना एक मुलगी झाली. ३ महिने त्यांनी या मुलीचा सांभाळ केला,  मात्र १८ डिसेंबरला या मुलीला एका बॅगेत टाकून वसईच्या चूळना रोड  परिसरातील फातिमा आश्रमाच्या  बाहेर कुणालाही नकळत ठेवले.  


आपल्या बाळाचा नीट सांभाळ व्हावा हा त्याचा हेतू होता. मात्र तिथल्या  नागरिकांनी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी या लहान  मुलीला ताब्यात घेतले.   


पोलिसांनी सध्या या दोघांवर गुन्हा दाखल केला असून लहान बाळाला डोंबिवलीच्या बाल सुधागरगृहात ठेवले आहे.  हे क्रूर कर्म करणाऱ्या मातापित्यांना तपासानंतर अटक करणार असल्याचे पोलिसांनी  सागितले आहे .