नागपूर : एका आयआयटीयन तरूणीने शेतकऱी तरूणाशी लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे, नावावर भरपूर शेती असलेला नवरा चालेल, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी असावी, असं सोयीचं गणित लग्नासाठी ग्रामीण भागातील मुलींच्या पालकांचं असतं, पण आयआयटीयन सपना संगलने हे गणित चुकीचं ठरवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपना संगलने आपला नवरा एक विधी पदवीधर निवडला आहे, शुक्रवारी हे शुभमंगल पार पडणार आहे.


नोकरीच्या मागे न लागता, जयंत नंदापुरे हे आधुनिक सेंद्रीय शेती करतात. ते विधी पदवीधर आहेत. गाव सोडणार नाही, मातीशी नाड तोडणार नाही असं जयंत नंदापुरे यांनी ठरवलं होतं, तर सपना संगल देखील आधुनिक शेतीचा विचार करणाऱ्या तरूणाच्याच शोधात होती.


सपना आर्किटेक्‍चर असून नैसर्गिक साधनांपासून गृहबांधणीचे ती कार्य करते. जयंत आणि सपना या दोघांनाही निसर्गाची आवड आहे. 


जयंतच्या घराचे बांबूचे छत सपनाला पहिल्या भेटीत आवडले आणि त्या दोघांनीही शेतात कमी खर्चातील कुडाचे इको-फ्रेंडली घर बांधून तिथेच राहण्याचे ठरविले. या घरातील फ्लोअर मातीचे राहणार आहे.