रत्नागिरी : दहावीत नापास झाल्यानंतर आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना आपण आजपर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण पास होऊनही आत्महत्या करण्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून जवळ असलेल्या आपटी गावातील ही घटना आहे. येथे दहावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने ८० टक्के गुण मिळाल्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


आज दहावीचा ऑनलाइन निकाल लागला. यात या मुलीला ८० टक्के गुण मिळाले. पण तिला ८५ टक्के गुण अपेक्षित होते. अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने या मुलीने मृत्यूला कवटाळे.  प्राची घडवले असे त्या मुलीचे नाव आहे. 


का केली आत्महत्या


इर्षामुळे ही आत्महत्या झाली असावी, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही विद्यार्थीनी अभ्यासात खूप हुशार होती. पण तिच्या मैत्रिणींना अनुक्रमे ८९ टक्के, ८८ टक्के आणि ८५ टक्के गुण मिळाले. पण हिला केवळ ८० टक्के मिळाले. त्यामुळे स्पर्धेच्या युगात या मुलीला आपण कमी पडलो असे वाटत असल्याने ती आत्महत्या केली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे. 


रिचेकिंगची संधी


प्राची अभ्यासात हुुशार असल्याने तिच्या शिक्षकांनी तिला आपण रिचेकिंगला पेपर टाकू असे सांगितले होते. पण नैराश्य अाल्याने तिने हे पाऊल उचलेले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


दहावीनंतर कमी संधी 


दहावीमध्ये आपल्या कमी गुण मिळाले तर आपल्याला कुठेच जाता येत नाही. ही भीती निरर्थक आहे. दहावी पेक्षा बारावीनंतर आणि पदवी परीक्षेनंतर अधिक संधी आहेत. त्यामुळे दहावीला विद्यार्थ्यांनी महत्त्व दिले पाहिजे. पण त्या गुणांमुळे आपली सर्वस्वी जडणघडण होईल हे मानणे चुकीचे असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


अनेक जण दहावीत किंवा बारावीत नापास होऊन आज यशाच्या उंच शिखरावर विराज मान आहेत. त्यामुळे दहावीत यश किंवा कमी गुणांनी न खचून जाता योग्य मार्ग निवडल्यास तुम्ही यशस्वी व्हाल, असे मत करिअर गाइडन्स अकादमीतील तज्ज्ञांनी सांगितले.