मुंबई : करण जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या  अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल' मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने पत्र लिहून मल्टिप्लेक्स चालकांना ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली आहे. तसं न केल्यास मनसे स्टाईल विरोधाला सामोरं जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. ‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ असा दम मनसेने या पत्रात मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे.