गोदापार्कमध्ये गुंडांचा मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ, नागरिकांकडून निषेध

एरवी सरावासाठी, जॉगिंगसाठी गोदापार्कवर येणारे खेळाडू, प्रशिक्षक , नागरिक आज सकाळी निषेधासाठी एकत्र आले होते.
नाशिक : एरवी सरावासाठी, जॉगिंगसाठी गोदापार्कवर येणारे खेळाडू, प्रशिक्षक , नागरिक आज सकाळी निषेधासाठी एकत्र आले होते.
नाशिकच्या गोदापार्कवर शुक्रवारी सकाळी दोघा गुंडांनी मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ घालत धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणीची छेड काढून अश्लिल हावभाव केले होते. त्यावेळी गुंडांना वैजनाथ काळे या प्रशिक्षकाने हटकले असता धारधार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
या घटनेच्या निषेधासाठी गोदापार्कवर सकाळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, प्रशिक्षक विजेंद्र सिंह यांच्यासह शहरातील खेळाडू पालक आणि प्रशिक्षक एकत्र जमले.
पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध करत सुरक्षेची मागणी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी केली. नवोदित खेळाडूंना आशा संकटाचा सामना करावा लागत असेल तर नवीन खेळाडू कसे तयार होतील असा सवाल उपस्थित करण्यात आला.