नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवला येथील उद्योगपती आणि माजी उपनगराध्यक्ष पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील दत्ता फुगे यांचा विश्वविक्रम त्यांनी मोडून काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकज यांच्या या शर्टची किंमत 98 लाख 35 हजार 99 रुपये इतकी आहे. पंकज पारख यांचा हा शर्ट 4.1 किलोचा आहे. 47 वर्षाचे पंकज पारख आपल्या अंगावर 10 किलो सोने घालून चालतात. त्याच्या रक्षणासाठी पारख यांच्यासोबत अर्धा डझन बाऊन्सर असतात.