नागपूर : नोटाबंदीनंतर केंद्र सरकार सोन्यावर बंदी आणेल या भीतीने बँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटांवर बंदी आणल्यानंतर आता घरातल्या सोन्या चांदीवर सरकार कारवाई करेल या शंकेनं नागपूरच्या देवडिया कुटुंबियांनी सोनं बँकेतून घरी आणलं. मात्र हे 1 किलो 110 ग्रॅम सोनं त्यांच्या घरात काम करणाऱ्या सुखराम आणि त्याच्या साथीदाराने चोरी केलं. 


पोलिसांनी या नोकराला साथीदारांसह अटक केली आहे. मात्र चोरलेल्या सोन्यापैकी केवळ 600 ग्रॅम दागिनेच पोलिसांच्या हाती लागलेत. उरलेल्या दागिन्यांची चोरांनी विल्हेवाट लावली होती. 


चोरांकडून दागिने विकत घेणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या विरोधातही कारवाई होणार आहे. मात्र कुठल्याही गोष्टीची अनाठायी भीती किती महागात पडू शकते याचा अनुभव देवाडिया कुटुंबाला आला आहे.