महालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!
करवीरनगरीत महालक्ष्मीची सुवर्ण पालखी काढण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, या पालखीचं वजन सुमारे २२ किलो ५०० ग्राम इतकं आहे.
कोल्हापूर : करवीरनगरीत महालक्ष्मीची सुवर्ण पालखी काढण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, या पालखीचं वजन सुमारे २२ किलो ५०० ग्राम इतकं आहे.
खास तयार करण्यात आलेल्या या सुवर्ण पालखीची दृश्य, सर्वप्रथम झी मीडिया आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहे. महालक्ष्मी मंदिरात या सुवर्ण पालखीचं पूजन शनिवारी होणार आहे.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला, ही सुवर्ण पालखी महालक्ष्मी देवीला अर्पण केली जाणार आहे. सुवर्णकार गणेश चव्हाण यांनी ही सुवर्ण पालखी तयार केली आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आलाय. या ट्रस्टद्वारे लोकसहभागातून या सुवर्ण पालखीची निर्मिती करण्यात आलीय.