गोंदिया :  जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून गोंदिया महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजचा शेवटचा दिवस  आहे. निसर्गाची मुक्त उधळण असेलला हा जिल्हा. त्यामुळंच आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी इथे कार्यशाळा घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदियातल्या छायाचित्रकारांना निसर्ग आणि वन्यजीवांचं संवर्धन छायाचित्रांच्या माध्यमातून कसं करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं. मागच्या वर्षीपासून गोंदिया महोत्सवाचं आयोजन करण्यात येतंय. 


14 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. आदिवासींना रोजगार निर्मिती होईल तसच पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतंय. गोडी चित्रकलेच्या माध्यमातून या महोत्सवाला सुरूवात करण्यात आली.